#unmukt

जीवनाच्या प्रवासात प्रत्येक व्यक्ति देवाकडे लहानपन पुन्हा मिळाव म्हणून मागन मागत असतो.पन जेंव्हा बालमज़दूर किंवा लहान मुलाना भिक मागतात तेव्हा मन असहाय होत. भारत हा असा देश आहे जिथे भिक मागने हा काही लोकानि व्यवसाय बनवला आहे.ही लोक अशा मुलाना शिक्षण देण्या ऐवजी त्यांना जबरदस्तीने भिक मागायला लावतात.

अनेक परिवार सुद्धा ह्या व्यवसायात स्वताच्या मुलाना लोटतात.त्यांना शिक्षणापेक्षा पैसा महत्वाचा वाटतो.आर्थिक उत्पन्न वाढवन्यसाठी ही लोक मुलाना भिक मागायला लावतात.

ही लोक स्वताच्या मूलांच आयुष्य उध्वस्त करत असतात.

ह्या सर्वात फक्त हीच लोक जबाबदार आहेत का?

उत्तर अर्थातच नाही. ह्या सर्वांसाठी आपणही कुठेतरी जबाबदार आहोत.आपणही त्यांच् भविष्य अंधकारमय करतोय.भिक मागनारी मूल त्यांना सांगीतल्या प्रमाणे ते भिक मागत असतात पन आपणही त्यांना भिक देवून कुठेतरी प्रोत्साहित करात असतोत.

भिक मागनारया मुलातली बरिचशी मूल ही अपहरण केलिलि असतात.भारतात मूलांच अपहरण करुण त्यांना भिक मागायला लावणाऱ्या अनेक टोल्या अस्तित्वात आहेत.भारतात दरवर्षी 60000 मूलांच अपहरण होत असत.ह्यतल्या बऱ्याच मुलाना भिक मगायच ह्या धन्दयात टाकल जात.ह्या मुलाना गुलामसरखी वागणूक दिली जाते.ह्या मुलाना शारीरिक ईजा पोहचवल्या जातात.त्यांचा मानसिक व शारीरिक छल केला जातो.

लोकांकडन सहानभूति व भिक मिळवण्यासाठी ह्या मुलाना उपाशी ठेवला जात,त्यांची हात,पाय,डोळे याना आधु केल जात.आपल्याला माहितच आहे की अपंग मुलाना जास्त सहानभूति मिलते त्यामुळे ही लोक ह्या मुलांचे हात-पाय कापतात.त्यामुळे त्यांना जास्त पैसे मिळतात.

भिक मागनरया मुलाना पैसे देवून त्यांना प्रोत्साहित करण्यापेक्षा ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या NGO व विविध संस्थाना मदत केल्यास ह्या मुलाना त्यांचा जास्त फायदा होईल.

 

-अनंत सूर्यवंशी

  •                             उन्मुक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *